EMBIBE स्कोअर कोशंट: आऊटकम इम्प्रूव्हमेंटसाठी मशीन लर्निंग
आम्ही असे मानतो की मापनक्षमता ही सुधारणेच्या केंद्रस्थानी आहे. जे मोजले जाऊ शकते ते सुधारले जाऊ शकते. Embibe स्कोअर कोशंट हा एक अंकीय पॅरामीटर आहे जो विद्यार्थ्यांची परीक्षेत गुण मिळवण्याची क्षमता मापतो. स्कोअर कोशंट ची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:
- चिंतनशील: Embibe स्कोअर चा स्तर हा विद्यार्थ्याच्या कामगिरीच्या सुप्त गुणधर्मांवर आधारित त्यांच्या क्षमतेबाबत चिंतनशील असले पाहिजे.
- भविष्यसूचक: विद्यार्थ्याच्या सध्याच्या कामगिरीच्या प्रवृत्तीवर आधारित हे सूचक असावे.
- मजबूत: एखाद्या वाईट किंवा चांगल्या टेस्टद्वारे विद्यार्थ्यांच्या स्कोअर कोशंटवर प्रतिकूल परिणाम होऊ नये.
- सामान्यीकृत: विविध टेस्टच्या काठिण्यतेच्या पातळीवर हे घटक सामान्यीकृत करणे आवश्यक आहे. काठिण्यतेच्या पातळीवर हे घटक सामान्यीकृत करणे आवश्यक आहे.
Embibe ने खालील बाबींचा वापर करून पॅरामीटर मिळवून विद्यार्थ्यांच्या स्कोअरच्या स्तराची गणना करण्यासाठी एक अल्गोरिदम विकसित केले आहे:
- सुप्त गुणधर्म: सुप्त गुणधर्म किंवा वैशिष्ट्यांमुळे Embibe Score Quotient मध्ये विद्यार्थ्याच्या अंगभूत क्षमतेचे दर्शन होते. हे सुप्त गुणधर्म प्रयत्न स्तरावरील इव्हेंट डेटाच्या माध्यमातून प्राप्त झाले असून ते प्लॅटफॉर्मवर कॅप्चर केले जातात. विद्यार्थी टेस्ट देतात आणि प्रॅक्टिस करतात यामुळेच हे शक्य होते.
- सर्वोत्कृष्ट सत्रे: N बेस्ट टेस्ट आणि/किंवा प्रॅक्टिस सत्रांचा विचार करून, ज्यामध्ये N हे कॉन्फिगर करण्यायोग्य असल्यामुळे हे Embibe स्कोअर कोशण्ट मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीची झलक दिसण्यासह आणखी मजबूत बनवते. पुढच्या टप्प्यामध्ये हार्मोनिक प्रोग्रेशनचा उपयोग उच्च स्कोअरिंग सत्रांपासून कमी स्कोअरिंग सत्रांपर्यंत महत्त्व कमी करण्यासाठी केला जातो.
- अलीकडील सत्रे: शेवटच्या K टेस्ट्स आणि/किंवा प्रॅक्टिस सेशन्स (सराव सत्रांचा) चा विचार केल्यास ते Embibe स्कोअर स्तराला सूचक आणि सध्याच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे दर्शक बनवते. जर प्रत्येक सत्रानंतर सामान्यीकृत सत्र गुण वाढीचा कल दर्शवित असेल, तर विद्यार्थी नजीकच्या भविष्यातही चांगली कामगिरी करू शकतील.
Embibe स्कोअर कोशंट हा तीन काटकोनी अक्षांवर प्रक्षेपित केला जातो – शैक्षणिक, आचरण आणि टेस्ट देणे. हे वेगवेगळे अक्ष विद्यार्थ्यांचे सुप्त गुणधर्म शैक्षणिक क्षमता, वर्तनस्तर आणि टेस्ट देण्याच्या कौशल्यावर वर्गीकृत करतात.
Embibe स्कोअर कोशंट ~ शैक्षणिक कोशंट + आचरण कोशंट + टेस्ट देण्यचा कोशंट
या आर्टिकलमध्ये समाविष्ट केलेल्या अभ्यासासाठी, आम्ही अनेक शैक्षणिक हंगामात हजारो वैध टेस्ट सत्रांचा विचार केला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने काही किमान थ्रेशोल्ड (आरंभी) वेळ दिलेला असेल आणि काही किमान प्रश्नांचा प्रयत्न केला असेल तरच टेस्ट सत्र वैध मानले जाते.
शैक्षणिक कोशंट विषयाच्या ज्ञानाशी संबंधित आहे. हायपर-पर्सनलाइज्ड लर्निंग फीडबॅकवर (हायपर – पर्सनलाइज्ड लर्निंग पडताळ्यावर) काम करून विद्यार्थी सलग टेस्ट्स मध्ये त्यांच्या शैक्षणिक कोशंटमध्ये सुधारणा करू शकतात -शैक्षणिक शिफारशींचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये वैयक्तिक प्रॅक्टिस पॅक म्हणून वितरीत केले जाते. याअंतर्गत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कमकुवत बाजूंसाठी तयार केलेल्या प्रश्नांचा प्रभावी संच असतो. परिणामी, आकृती 1 मध्ये पाहिल्याप्रमाणे शैक्षणिक कोशंटमध्ये स्थिर सुधारणा होत आहे.
आचरण कोशंट विद्यार्थ्यांच्या हेतूशी निगडीत आहे – उच्च स्कोअर मिळवण्यासाठी विद्यार्थी किती प्रेरित, चौकस आणि वचनबद्ध आहे. प्रथम युजर्सचे आचरणाचे गुणधर्म ठरवून आणि नंतर वाढीव सुधारणेसाठी प्रगतीशील ध्येये निश्चित करून Embibe विद्यार्थ्यांना त्यांचे आचरण कोशंट सुधारण्यास मदत करते [1]. एकदा एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या सुप्त आचरणाच्या हेतूच्या बाबतीत कुठे कमतरता आहे हे कळले की, तो त्याबद्दल जागरूक राहून त्याचा आचरण कोशंट सुधारू शकतो. आकृती 2 मध्ये पाहिल्याप्रमाणे, प्रारंभिक आचरणात सुधारणा खूप वेगाने होते आणि नंतर, प्रत्येक सलग टेस्ट नंतर हळू, परंतु स्थिर सुधारणा होते.
आचरण कोशंट विद्यार्थ्यांच्या हेतूशी निगडीत आहे – उच्च स्कोअर मिळवण्यासाठी विद्यार्थी किती प्रेरित, सजग आणि वचनबद्ध आहे. प्रथम युजर्सच्या आचरणाचे गुणधर्म ठरवून आणि नंतर वाढीव सुधारणेसाठी प्रगतीशील ध्येये निश्चित करून Embibe विद्यार्थ्यांना त्यांचे आचरण कोशंट सुधारण्यास मदत करते [1]. एकदा एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या सुप्त आचरणाच्या हेतूच्या बाबतीत कुठे कमतरता आहे हे कळले की, तो त्याबद्दल जागरूक राहून त्याचा आचरण कोशंट सुधारू शकतो. आकृती 2 मध्ये पाहिल्याप्रमाणे, प्रारंभिक आचरणात सुधारणा खूप वेगाने होते आणि नंतर, प्रत्येक सलग टेस्ट नंतर हळू, परंतु स्थिर सुधारणा होते.
टेस्ट देण्याचा कोशंट हा वेळ व्यवस्थापन आणि टेस्ट सत्रामध्ये उत्तर दिले जाणाऱ्या प्रश्नांच्या प्राधान्यक्रमाशी संबंधित आहे. टेस्ट देण्याचा स्तरामध्ये सुधारणा झाल्याने स्वाभाविकपणे Embibe स्कोअर कोशंट सुधारते कारण उत्तम टेस्ट देण्याच्या धोरणांमुळे लर्निंग आऊटकम अधिक दृढ होतात. आकृती 3 मध्ये पाहिल्याप्रमाणे, टेस्ट देण्याचे कोशंटमध्ये सुधारणा सुरुवातीला जास्त आहे त्यानंतर हळूहळू, परंतु स्थिर वाढ होते.
Embibe स्कोअर कोशंटचे शैक्षणिक, आचरण आणि टेस्ट देण्याच्या कोशंटमध्ये विभाजन केल्याने लर्निंग आऊटकम होण्यास प्रभावी शिफारसी सक्षम बनवते.
संदर्भ:
फाल्डू के., थॉमस ए., डोंडा सी. आणि अवस्थी ए., “लर्निंग आउटकम साठी काम करणारे आचरण संकेत”, Data Science Lab, Embibe, https://www.embibe.com/ai-detail?id=2, 2016.