Saas द्वारे AI अनलॉक करत आहे
क्षमतेवर आधारित शिक्षणामध्ये, असलेले ज्ञान विद्यार्थ्यावर लादले जात नाही. येथे, विद्यार्थी स्वतःच्या मार्गाने ज्ञान आणि कौशल्ये मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतात.
वर्ग-अधारित पांरपारिक शिक्षणात, दिलेल्या अभ्यासक्रमा करीता, प्रत्येक विद्यार्थ्याला गुण मिळतात आणि पुढील वर्गामध्ये प्रवेश दिला जातो, परंतू अभ्यासक्रमात सर्व विद्यार्थी एकाच पातळीवर प्राविण्य मिळवत नाहीत. काहींना सर्वोत्कृष्ट A+ ग्रेड मिळू शकतो, तर इतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या क्षमतांमुळे C किंवा कमी गुण मिळवू शकतात. म्हणून, दिलेल्या कालावधीत, काही इतरांपेक्षा अधिक शिकतात.
क्षमतेवर-आधारित शिक्षण हे पद्धतशीर कल्पनेचा संदर्भ घेते:
a. सूचना
b. मूल्यांकन
c. वर्गीकरण
d. शैक्षणिक अहवाल
यामध्ये विद्यार्थ्याला शिकलेले ज्ञान आणि कौशल्य सादर करावी लागतात. आधुनिक शाळांमध्ये विहित मानकांचे अनुसरण केले जाते, क्षमता-आधारित शिक्षण शैक्षणिक अपेक्षांचे वर्णन करते आणि अभ्यासक्रम किंवा ग्रेड स्तरांसाठी “योग्यता” किंवा “प्रवीणता” चे अनेक विभाग परिभाषित करते. याचे कमीत कमी ध्येय हे निवडलेल्या क्षेत्रामध्ये किंवा करिअरच्या मार्गामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि आवश्यक कौशल्य प्राप्त करणे आहे. जेव्हा ठरवलेल्या अपेक्षा पुर्ण होत नाहीत, तेव्हा विद्यार्थ्यांना आवश्यक क्षमता पातळी गाठण्यासाठी त्यांना अतिरिक्त शैक्षणिक सहाय्याने सल्ला दिला जातो आणि प्रशिक्षित केले जाते.
Embibe प्रोडक्ट / वैशिष्ट्ये : लर्न, प्रॅक्टिस, टेस्ट, आमच्या सोबत सोडवा
विद्यार्थ्याकरीता त्यांची उद्दिष्टे आणि कौशल्यांचे निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने डिझाइन केलेल्या ‘लर्न’, ‘प्रॅक्टिस’ आणि ‘टेस्ट’ वैशिष्ट्यांद्वारे शिकण्याच्या परिणामावर लक्ष केंद्रीत करत, Embibe क्षमतेवर-आधारित शिकणे हे त्यांच्या विद्यार्थ्यासाठी परीणामकारक पणे वापरते. Embibe चा AI आधारित प्लॅटफॉर्म विद्यार्थ्याच्या व्यक्तीगत क्षमता, शिकण्याच्या प्रक्रियेत विभिन्न पातळीवर नोंदवतो आणि सतर्कतेने ओळखतो. यामुळे पुर्वनिर्धारीत करिअर ध्येय किंवा ध्यैये गाठण्याचा प्रवास जलद करण्याची साधने प्रत्येक विद्यार्थ्याला देत, अंश शोधन करतो, विश्लेषण करतो आणि यशस्वी मार्गदर्शक नकाशे, धोरणे प्रदान करतो.
Embibe च्या मुख्य वैशिष्ट्यापैकी एक, “प्रॅक्टिस” जो क्षमता-आधारीत शिक्षणाच्या दृष्टीकोनातून काम करतो, विद्यार्थ्यांना प्रत्येक विशिष्ट संकल्पनेत उत्कृष्ठ होण्यास मदत करण्यासाठी प्रश्नांची काठिण्य पातळी योग्यरित्या ठरवून आणि वाढवून स्वयं-गतीने शिकण्याची अनुमती देते.
एक मजबूत क्षमता-आधारीत शिक्षण मॉडेलची सुनिश्चित करण्यासाठी, ते अधिक स्पर्धात्मक आणि ध्येयाभिमुख होण्यासाठी Embibe विभिन्न मापदंडावर काम करते. स्वत:हून प्रश्नाचे उत्तर सोडवण्याच्या क्षमतेच्या संधी प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजांना प्राधान्य देते. रिअल-टाइम अहवाल, संकल्पने-नूसार कमकुवतपणा शोधणे, विषय-पातळीवर प्रवीण्यतेचे निदान करणे, सुधारणा हव्या असणार्या भागाकरीता कार्यक्षम उजळणी(रिव्हिजन) योजना, प्रत्येक प्रश्न-पातळीवर विश्लेषण आणि संकल्पना-स्तरावरील सर्वसमावेशक शिक्षण सामग्री क्षमता-आधारित शिक्षण गुणवत्ता वाढवते.
Embibe’चे “आमच्या सोबत सोडवा” ही प्रश्न सोडविण्यची अनोखी परस्पर संवादाची पद्धत आहे. Embibe अभ्यासक्रम हा लहान-लहान विषयात, संकल्पना आणि क्षमतामध्ये विभागला आहे. हे सखोल स्तरावर मजबूत आणि कमकुवत संकल्पना समजून घेण्यास आणि आवश्यक व्यक्तीगत मदत देण्यात मदत करते. “आमच्या सोबत सोडवा” हे महत्वाच्या संकल्पना समजण्यात मदत करते ज्यामध्ये विद्यार्थ्याला प्राविण्य मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न पातळीवर जर विद्यार्थी हिंट पाहून देखी प्रश्न सोडवू शकत नाही तर ते “आमच्या सोबत सोडवा” ची मदत घेऊ शकतात जे त्यांना स्टेप नुसार उत्तराकडे जाण्यास मार्गदर्शन करतात.
Embibe संबंधित स्टेप नुसार पुढे लहान हिंट देते आणि शेवटी प्रश्नाचे तपशीलवार उत्तर सहजतेने आपल्या समोर मांडते.