क्षमता पातळी वाढविण्यासाठी गतिशील आणि अनुकूल प्रॅक्टिस

आमचे शिफारस इंजिन, आमच्या स्वतःच्या “आमच्या सोबत सोडवा” प्रॅक्टिससह विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने त्यांचे ज्ञान परिपूर्ण करण्यासाठी मदत करत आहे.

Embibe च्या प्रॅक्टिसमध्ये 10 लाख+ इंटरॅक्टिव्ह प्रश्न युनिट्सच्या प्रगत शिक्षणशास्त्राचा समावेश आहे ज्यामध्ये टॉप-रँक असलेल्या 1000+ पुस्तकांतील धडे आणि टॉपिक्स आहेत. सखोल ज्ञानाचा मागोवा घेणाऱ्या ट्रेसिंग पद्ध्तीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रॅक्टिस मार्ग पर्सनलाइज्ड करून अनुकूल प्रॅक्टिस फ्रेमवर्कद्वारे प्रॅक्टिस अधिक सक्षम केली जाते. प्रॅक्टिसची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  1. प्रश्न सोडवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म वैयक्तिकरण चालविण्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 63+ टॅग करण्यायोग्य घटकांमध्ये खंडित करून प्रॅक्टिसमध्ये प्रश्नांचे जगातील सर्वात व्यापक ग्रॅन्युलरायझेशन असते.
  2. प्रॅक्टिस हे जगातील एक सखोल संशोधन आहे कारण ते “आमच्यासोबत सोडवा” या खाजगी शिक्षणशास्त्राचा वापर करून व्यक्तिनिष्ठ प्रश्न सादर करते.
  3. हे सर्व  प्रॅक्टिस कन्टेन्टला Embibe च्या 74,000+कॉन्सेप्टच्या ज्ञान आलेखासोबत जोडते.
  4. हे K-12, महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा आणि नोकरी/सरकारी परीक्षांसह 310 परीक्षांमध्ये सर्व कॉन्टेन्ट पॅकेज करते. 
  5.  ते रन-टाइममध्ये सॉल्व्हर आणि टेम्प्लेट्स वापरुन गतिशील पद्धतीने वैयक्तिकृत प्रश्न निर्माण करते.
  6. हे प्रगत NLP-चालित वाक्यप्रचार मूल्यांकनकर्ता वापरते ज्यामध्ये दीर्घ शब्दप्रयोग, वाक्यप्रचार आणि दीर्घ उत्तरे स्वयंचलितपणे मूल्यांकन करण्याची क्षमता असते.
  7. जेव्हा एखादा विद्यार्थी एखाद्या प्रश्नातील कॉन्सेप्ट किंवा सक्षमतेशी संघर्ष करत असेल तेव्हा लर्निंगसाठी शिफारस असलेले इंजिन वापरून, इंटर्व्हेन्शन  व्हिडिओ आणि हिंट द्वारे स्वयंचलित मदत प्रदान करते.
  8. ‘प्रॅक्टिस’ विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रॅक्टिस करण्यासाठी अभ्यासक्रमातील विषय आणि कॉन्सेप्टवर पुरेसे प्रश्न पुरवितो. सविस्तर उदाहरणे Embibe येथील तज्ञांनी तयार केलेले आहेत.
  9. विद्यार्थी या प्रॅक्टिस प्रश्नांना त्यांच्या गरजेनुसार,धड्यानुसार किंवा विषयानुसार ‘व्हिडिओसह असलेली पुस्तके आणि उदाहरणे’, ‘बिग बुक्स’ किंवा ‘प्रॅक्टिसचे धडे’ याद्वारे प्रवेश करू शकतात. ‘आमच्यासोबत सोडवा’ हे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यास मदत करण्यासाठी प्रश्न स्तरावर सूचना आणि पायऱ्यांच्या स्तरावर मायक्रो हिंट्स देते. जर विद्यार्थी तरी देखील ते  सोडवू शकत नसतील, तर प्रत्येक प्रश्नासाठी सविस्तर उकल उपलब्ध करून दिलेली आहे.
  10. ‘महत्त्वाचे’, ‘कठीण’ व ‘मोठ्या लांबीचे’ टॅग आपल्याला हे सुनिश्चित करण्यात मदत करतील की आपल्या अभ्यासादरम्यान टॉपिक आणि धडा या दोन्ही लेव्हलवर कोणताही महत्त्वाचा धडा चुकला नाही. तसेच, कठीण आणि लांबीवर आधारित, आपण धड्याला प्राधान्य देऊ शकता.
  11. विद्यार्थ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी आणि प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेली मानक पुस्तके अनुक्रमे आमच्या प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित केली जातात. पुस्तक अधिक प्रसिद्ध आहे, ते उच्च दर्जाचे असेल आणि त्यानुसार ते आमच्या प्लॅटफॉर्मवर क्रमबद्ध केले जाईल.
  12.  Embibe अभ्यासक्रम हे तुमच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विस्तृत अभ्यासावर, मागील वर्षांतील आपल्या लक्ष्यित परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न आणि आपल्या इयत्तेसाठी किंवा परीक्षेसाठी निर्धारित मजकूर किंवा लोकप्रिय पुस्तकांच्या आधारे डिझाइन केलेले आहे. पुस्तकाच्या अभ्यासात, पाठोपाठ अभ्यासक्रम पुस्तकानुसार असतो. तथापि, ‘धड्यांमार्फत प्रॅक्टिस’, ‘Embibe बिग बुक’ आणि ‘टेस्ट’ मध्ये पाठपुरावा केलेला अभ्यासक्रम Embibe अभ्यासक्रम आहे.
  13. प्रयत्नांच्या गुणवत्तेतील सात वेगवेगळ्या जार खालील प्रकारच्या उत्तरांची संख्या दर्शवतात:

A. खूप जलद योग्य प्रयत्न: ज्या प्रयत्नात विद्यार्थ्याने त्याच्या निर्धारित वेळेच्या 25% पेक्षा कमी वेळेत एखाद्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले असेल त्या प्रयत्नाला  खूप जलद अचूक प्रयत्न म्हणतात.

B. योग्य प्रयत्न: निर्धारित वेळेच्या 25% पेक्षा जास्त परंतु निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत विद्यार्थ्याने प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेल्या प्रयत्नाला योग्य प्रयत्न असे म्हणतात.

C. अधिक वेळेत योग्य प्रयत्न: निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ वापरून विद्यार्थ्याने प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेल्या प्रयत्नाला अधिक वेळेत योग्य उत्तर देणारा प्रयत्न म्हणतात.

D. व्यर्थ घालवलेला प्रयत्न: ज्या प्रयत्नात विद्यार्थ्याने त्याच्या आदर्श वेळेच्या 25% पेक्षा कमी वेळेत एखाद्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले त्याला व्यर्थ घालवलेले प्रयत्न असे म्हटले जाते.

E. अधिक वेळेत अयोग्य प्रयत्न: ज्या प्रयत्नात विद्यार्थ्याने ठराविक वेळेत एखाद्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले, जे निर्धारित वेळेच्या 25% पेक्षा अधिक परंतु निर्धारित वेळेपेक्षा कमी असेल, त्याला चुकीचा प्रयत्न असे म्हटले जाते.

F. अधिक वेळा अयोग्य प्रयत्न: ज्या प्रयत्नात विद्यार्थ्याने निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ खर्च करून एखाद्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले तर त्याला अयोग्य प्रयत्न असे म्हणतात.

G. प्रयत्न न केलेले: हा न सोडविललेला प्रयत्न असतो/यात उत्तर चिन्हांकित केलेले नसत्ते. असा प्रयत्न जिथे विद्यार्थ्याला प्रश्नाबद्दल खात्री नसते आणि त्यावर त्याचे कोणतेही मत नसते आणि तो प्रश्न सोडवत नाही.

प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो आणि त्याचा लर्निंगचा प्रवास वेगळा असतो. त्यांना त्यांच्या लर्निंगच्या स्थितीवर आणि प्रॅक्टिसमधील कामगिरीच्या आधारावर दिलेल्या सूचनांची आवश्यकता असते. शिफारस केलेले लर्निंग हा एक वैयक्तिकरण स्तर आहे जो Embibe प्लॅटफॉर्मवरील विद्यार्थ्याच्या कामगिरीवर आधारित असतो. हे वैयक्तिकृत लर्निंग मार्ग सुचवते जे विद्यार्थ्यांनी प्रगतीसाठी त्याचा वापर केला पाहिजे. नॉलेज ग्राफच्या साहाय्याने, Embibe विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पूर्व-आवश्यक कॉन्सेप्ट लर्न करण्याची शिफारस करते. ‘नेक्स्ट क्वेश्चन इंजिन’ विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार योग्य काठिण्य पातळीचे प्रश्न प्रदान करते.