समाजाचे डिस्कूलींग

पारंपारिक शिक्षण प्रणाली जी समान निकष लावत विद्यार्थ्यांना साचेबद्ध चौकटीत अडकवते व डिस्कुलिंग तत्वज्ञान जे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीनुसार व आवडीनुसार शिकण्यास चालना देते. जाणून घ्या या विद्यार्थीकेंद्रित शिक्षण प्रणालीबद्दल.

पारंपारिक इयत्ता अनुरूप शिक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता मोजण्यासाठी समान मापदंड वापरले जातात. सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी ठराविक अभ्यासक्रमांवर आणि परीक्षांवर आधारित आहे. याचा काय परिणाम होतो? या पद्धतीमध्ये अपेक्षेनुरूप लर्निंग आऊटकम साध्य होत नाहीत. विद्यार्थ्यांना अपेक्षित असणाऱ्या पातळीवर ज्ञान आत्मसात करता येत नाही किंवा वास्तविक-जगातील समस्या सोडवण्यासाठी त्यांची कौशल्येसुद्धा विकसित होऊ शकत नाहीत. याचाच परिपाक म्हणजे कंटाळलेले शिक्षक व विद्यार्थी ज्यांना कुठल्याही गोष्टीचा आनंद घेणे दुरापास्त होऊन बसते. 

शाळेत मिळणारी शिकवण म्हणजेच खरे शिक्षण असा विद्यार्थ्यांचा ठाम समज होऊन बसतो. परीक्षेत मिळणारे गुण, वर्गात पहिले येण्याची चढाओढ, डिग्री डिप्लोमा यांच्यामागे होणारी धावाधाव यामध्ये शिक्षण कुठेतरी मागे पडतं. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला एका साचेबद्ध चौकटीत बसविण्याचा अट्टाहास केला जातो. शाळेत शिकवली जाणारी प्रत्येक गोष्ट आहे तशी स्वीकारायची असते असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. आपण शिक्षणाचा अत्यंत चुकीचा अर्थ लावल्याने आज शालेय व्यवस्थेला बदलण्याची नितांत गरज आहे. विद्यार्थ्याची क्षमता ही आजघडीला केवळ परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर ओळखली जाते. त्यामुळे सध्यास्थितीत शिक्षणाचे महत्व केवळ कमी झालेले नसून ते अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. 

एका परिणामकारक शैक्षणिक व्यवस्थेची दोन प्राथमिक उद्दिष्टे असतात. प्रथमतः, ज्यांना शिकायचे आहे त्यांना वेळेवर शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देणे. दुसरे म्हणजे, ज्यांना ज्यांच्याकडे ज्ञान आहे व ज्यांना शिकायचे आहे अश्या व्यक्तींना या व्यवस्थेने एकाच मंचावर आणण्याची गरज आहे. या दोन्ही बाबींचा आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अभाव आहे.

पारंपरिक शालेय व्यवस्था ही अभ्यासक्रमकेंद्रित शिक्षण व दैनंदिन वेळापत्रकामध्ये गुंतलेली आहे. डिस्कूलिंग सिद्धांत विद्यार्थ्यांना या जाचातून मुक्त करतो. जेव्हा शालेय व्यवस्था विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम लादते तेव्हा त्यांची सर्जनशीलता व जिज्ञासा दोन्ही नष्ट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स शिकताना सुध्दा बऱ्याच अडचणी येतात व त्यांच्या व्यक्तिमत्वाची वाढ खुंटते. सत्तरच्या दशकात तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ इव्हान इलिच यांनी प्रकाशित केलेल्या ‘डिस्कूलिंग सोसायटी’ या पुस्तकामुळे ही संकल्पना बरीच लोकप्रिय झाली. ही व्यवस्था विद्यार्थ्यांना परिणामकाररित्या शिकण्यास मदत करते. या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेली ही एक अशी शैक्षणिक व्यवस्था आहे जिथे जिथे मुल हे त्याच्या आवडीप्रमाणे व गतीप्रमाणे त्याला काय शिकायचे ते निवडते आणि प्रौढ व्यक्ती यासाठी मार्गदर्शन करतात. तेव्हापासून ही व्यवस्था बरीच विकसित झालेली आहे.

पारंपारिक शिक्षणाची चौकट तोडून विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या गतीने स्वतःची वैयक्तिक शिक्षण उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी घरूनच शिक्षण घ्यावे असे या शिक्षण पद्धतीचे स्वरूप आहे. अनेक लोक असे मानतात की हीच व्यवस्था शाळांनी सुद्धा स्वीकारली पाहिजे.

ज्युलिओ रॉगेरो डिस्कूलिंगचे महत्त्व स्पष्ट करताना असे म्हणतात की, “विद्यार्थ्यांना नकारात्मकता, नियंत्रण, ठरवून दिलेल्या, लादलेल्या, रटाळवाण्या आणि पुनरावृत्तीपासून दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी हे शिकण्याच्या व जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून स्वतःहून त्यांची शिक्षण प्रक्रिया उभी करू शकतील”.

डिस्कूलिंगमध्ये केवळ मुलांचे पालकच नव्हे शिक्षकही मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. शिक्षक किंवा प्राध्यापक हे वर्गपाठ सामग्री पूर्वनियोजित वेळेनुसार देतात आणि विद्यार्थ्याच्या शैक्षणिक मूल्यमापनावर निर्णय घेतात. कुटुंब हे डिस्कूलिंग शिक्षण पद्धतीमध्ये अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी पालक अजूनही मुलांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व व कौशल्यांचा विकासापेक्षा त्यांना परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर जास्त भर देतात. खरंतर पालकांनी त्यांच्या पाल्याला पुस्तकी किडे बनवण्यापेक्षा चिकित्सक बुद्धी व व्यावहारिकदृष्ट्या सजग व समंजस बनविण्यावर भर दिला पाहिजे.

Embibe प्रोडक्ट/वैशिष्ट्ये –  लर्न,  प्रॅक्टिस, टेस्ट, एनरीच युअर लर्निंग, फ्युचर स्किल करीकुलम, स्किल बेस्ड डायग्नॉस्टिक्स

Embibe च्या ‘लर्न’ आणि ‘प्रॅक्टिस’ सारख्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून डिस्कूलिंग चे महत्व अधोरेखित केले जाते. याअंतर्गत विद्यार्थी कोणताही विषय त्यांच्या स्वत:च्या गतीने,  हवे तेव्हा समजून घेऊ शकतात आणि विविध काठिण्य पातळीवरील प्रश्नांचा प्रॅक्टिस करून स्वतःचे विश्लेषण करू शकतात. सर्वात महत्वाचा भाग म्हणजेच ‘टेस्ट’ जी विद्यार्थ्यांना स्वयं-मूल्यांकन करण्यात मदत करते.

Embibe चे ‘एनरीच युअर लर्निंग’ या श्रुंखलेतील व्हिडिओ व्यावहारिक प्रात्यक्षिकांसह विविध विषयावर स्पष्टीकरण देतात. इथे विद्यार्थ्यांना भविष्यातील शोध आणि नवकल्पनांसाठी विचार करण्यास वाव मिळतो.  

Embibe चे ‘एनरीच युअर लर्निंग’ या श्रुंखलेतील व्हिडिओ व्यावहारिक प्रात्यक्षिकांसह विविध विषयावर स्पष्टीकरण देतात. इथे विद्यार्थ्यांना भविष्यातील शोध आणि नवकल्पनांसाठी विचार करण्यास वाव मिळतो.  

‘कौशल्य-आधारित विश्लेषण’ विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात स्वतःची कौशल्ये पडताळून पाहण्याची संधी देते आणि त्यांना त्यांचे शिक्षण व्यावहारिक जगात वापरून पाहता येते. यानंतर होणारे मूल्यमापन हे विद्यार्थ्यांना सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करते. 

‘फ्युचर स्किल करीकुलम’ विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये, ज्ञान, दृष्टिकोन व मूल्ये यांची परिणामकारकता पडताळून पाहत एक उत्तम भविष्य घडविण्यासाठी मदत करते.